Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराजकीयग्रा. पं. पोटनिवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध...

ग्रा. पं. पोटनिवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध…

अकोला – संतोषकुमार गवई

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी ग्रामपंचायत तसेच कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मुदत संपणा-या, नवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा आदी कारणांमुळे सदस्य व थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सार्वत्रिक निवडणूक असलेल्या १७, तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ५७ अशा ७४ ग्रामपंचायतीतील ९१ सदस्य व ४ थेट सरपंच या पदांच्या निवडणूकांसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी पारंपरिक पध्दतीने तयार करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत कार्यालय, तसेच संबधित कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.  

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: