महाराष्ट्रात सह अकोल्या जिल्हयाच्या वतीने शेती व शेतकऱ्याच्या समस्या संदर्भात मा. कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब, मा. ना एकनाथ जी शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रा. कॉ प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अकोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. फौजीया खान यांना शेतकऱ्यांनच्या समस्याची माहिती दिली,
हकीकत अशी की जून महिन्यामध्ये एक ते दोन वेळा पाऊस पडला त्या पाऊसाच्या आधारे शेतक-यांनी पेरणी केली त्यानंतर एक महिना पावसाचा खंड पडल्यामुळे लोकांना शेतात पेरलेले सोयाबीन व इतर पिके मोडावी लागली शेतकऱ्यांचे १००% नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी केली शेतकऱ्यांनची पिके चांगली निघाली परंतु राज्यामध्ये सततचा पाऊस सुरु झाला अनेक जिल्हयांमध्ये तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली,
ढगफुटी झाली सततच्या पाऊसामुळे शेतक-यांच्या शेतातले सर्व प्रकारचे पिके पाण्या / पावसामुळे सडले / खराब झाले. पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा रोग आला. सोयाबीन, तुरीच्या पिकांवर अळया निर्माण झाल्या शेतात उभे असलेली पिके वाचविण्याकरीता शेतकऱ्यांना फवारणी करण्याकरीता सततचा सुरु असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही,
अशा विविध समस्येच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासना मार्फत हेक्टरी ५००००/- रु. ची मदत जाहीर करावी व शेतकरी वर्गाला सहकार्य करावे अश्या संदर्भातले निवेदन महाराष्ट्र शासनाला व अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी साहेब अकोला,
उपविभागीय साहेब मूर्तिजापूर, रा.कॉ प्रदेश सरचिटणीस रवींद्र जी पवार यांना प्रत्येक्ष भेटून व ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले या मध्ये विशेष म्हणजे दिनांक -28/08/2024 ला प्रत्येक्ष भेटून माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या समोर शेतकऱ्यांनाच्या समस्या मांडल्या या वेळी अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब,
अकोला रा. कॉ. जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड, निजाम भाई इंजिनीअर, प्राध्यापक बिस्मिल्लाह खान, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते…