पातूर – निशांत गवई
राज्यात मंत्री मंडळाचा नुकताव विस्तार पार पडला. या विस्ताराचा सत्ता संघर्ष शिघेला पोहलचला असताना मात्र पातूरच्या शाळेत एक निरागस आगळा – वेगळा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये मुख्यमंत्री यांच्यासह वीस मंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली.
पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या एका दिमाखदार शपथविधी सोहळ्यात राज्यपाल यांनी नवं निर्वाचित मंत्र्यांना शपथ दिली.
विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया समजावी यासाठी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवत असते. शैक्षणिक सत्र 2024 -25 या सत्रासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना एका बैठकीत खातेवाटप करण्यात आले.
यामधून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तर यासह विविध खाते वाटप करीत वीस मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. या खाते वाटप झालेल्या सर्व मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच किड्स पॅराडाइजच्या सभागृहात थाटात पार पडला. राज्यपाल म्हणून नियुक्त असलेल्या अमृता शेंडे या विद्यार्थिनीने सर्व मंत्र्यांना शपथ दिली.
या सोहळ्याला शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, तलाठी डाबेराव साहेब, झी २४ तास चे जिल्हा प्रतिनिधी जयेश जगड, युसीएन न्यूज चे प्रतिनिधी संजय चक्रनारायण प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणून श्रावणी गिऱ्हे, उपमुख्यमंत्री सिद्धांत वानखडे, साहिल पवार गृहमंत्री, श्रुती तायडे अर्थमंत्री,
नमिशा सुगंधी शिक्षण मंत्री, प्रसाद जायभाये कृषीमंत्री, शर्वरी दळवे-सांस्कृतिक मंत्री, आकाश पांडे क्रीडामंत्री,
ओम जाधव आरोग्य मंत्री, आयुष सोनोने पर्यावरण मंत्री, जलसंपदा मंत्री अपूर्वा गाडगे,महिला व बालकल्याण मंत्री पूर्वी उगले आदींनी तर पालकमंत्री म्हणून स्पंदन गाडगे, श्रिया कढोणे, प्रणित डिवरे, ईश्वरी जायभाये, सर्वेश सुधाकर गव्हाळे,आर्वी उगले, ऋत्विक बोचरे, अन्वी इंगळे आदिनी पालकमंत्री पदाची शपथ घेतली.
पोलीस सुरक्षा रक्षक म्हणून सार्थक शेंडे, प्रशिका खंडारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. राज्यपालचे सेवक म्हणून केशव वर्मा,वेदांत भांगे यांनी काम पहिले. संचालन अक्षरा शेंडे, गौरी गाडगे यांनी तर आभार अक्षरा फाटकर, पूर्वा तेलगोटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, प्रतीक्षा भारसाकळे, स्वाती वाळोकार, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, ऋतुजा राऊत, नेहा उपर्वट, रुपाली पोहरे, शुभम पोहरे, मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.