महाराष्ट्र राज्य सरकारी लघुलेखक संघटनेचे सचिव डॉ. सोहन चवरे यांचे प्रतिपादन…..
विभागीय कृषि सहसंचालक यांचे स्विय सहायक सुधीर चावरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप….
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :- कर्तव्यनिष्ठ भावनेने व जनतेच्या कल्याणासाठी सकारात्मक दृष्टीने केलेली शासकीय सेवा हीच खरी समाजसेवा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारी लघुलेखक संघटनेचे सचिव तथा नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक डॉ. सोहन चवरे यांनी केले.
विभागीय कृषि सहसंचालक यांचे स्विय सहायक तथा उच्च श्रेणी लघुलेखक सुधीर चावरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम विभागीय कृषि सहसंचालक यांच्या कार्यालयातील सभागृह, प्रशासकीय इमारत क्रमांक २, सिव्हील लाईन्स नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी सत्कारमूर्ती सुधीर चावरे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती सुधीर चावरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व लघुलीपीचे जनक सर आयझॅक पिटमन यांचे फोटो व कलम असलेले स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्ती सुधीर चावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांची ३३ वर्षे पेक्षा कृषि विभागात सेवा झाली असून सुरुवातीला कोकण विभागात फलोत्पादन विभागात उत्तम सेवा केल्यामुळे तत्कालीन राज्य शासनाचे सचिव यांनी त्यांना प्रतिनिुयुक्तीवर घेतले होते, त्या ठिकाणी उत्तम सेवा केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वर्धा व नागपूर, वनामती, नागपूर, विभागीय कृषि सहसंचालक अमरावती व सध्या नागपूर येथे सेवा दिली आहे.
या सेवा कालावधीत कुठलीही अपेक्षा न ठेवता हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. माझ्या ३४ वर्षापेक्षा अधिकच्या सेवेत मी समाधानाने सेवानिवृत्त होत असून संघटनेच्या लघुलेखक संवर्गाच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य लघुलेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र महसूल लवाद येथील न्यायाधीश यांचे स्विय सहायक संतोष वानखेडे यांनी संघटनेमार्फत सर्वांना एकजूट करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले.
संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा मनरेगा आयुक्तांचे पी.ए. महेश पवार यांनी सुधीर चावरे यांनी केलेली सेवा ही आदर्श सेवा असून ती सर्वांना प्रेरणादायी आहे.
विभागीय कृषि सहसंचालक येथील कृषी अधिकारी (राजपत्रित) श्री. सरदेसाई यांनी शासकीय सेवेत लघुलेखक संवर्ग अत्यंत महत्वाचा असून शासनाने या संवर्गा चे महत्व ओळखून त्यांना न्याय देण्याची भावना व्यक्त केली. या निरोप समारंभास विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, लघुलेखक संघटनेचे रवींद्र वरंभे, राहुल रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सरकारी लघुलेखक संघटनेचे सचिव तथा कार्यकारी संचालक व्हीआयडीसी यांचे पी.ए. प्रशांत मोहोड यांनी आभार प्रदर्शन केले.