Wednesday, January 8, 2025
HomeUncategorizedनांदेड जिल्ह्यातील माहे सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर...

नांदेड जिल्ह्यातील माहे सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर, 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे.नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या ७,८३,९१५ शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्‍कम मंजूर केली आहे.

ही रक्‍कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी आता पर्यंत जिल्‍हृयातील ३,८३,२९७ इतक्‍या शेतकर्‍यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्‍या त्या गावाच्या तलाठयांना देण्‍यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्‍यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम जमा होणार आहे. उर्वरीत ४ लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील २ दिवसात भरण्‍यात येणार आहे.

त्‍यामुळे सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या शेतकरी यांनी आपल्या तलाठीकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्‍यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्‍यावी,जेणे करुन त्‍यांच्‍या खात्‍यावर मदतीची रक्‍कम जमा होईल,असे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: