16 जुलैला होणार मेळावा
अकोला : हरीत क्रांती प्रणेता माजी मुख्यमंत्री वसंतराव नायक यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त 16 जुलैला जानोरकर मंगल कार्यालय, रिंगरोड येथे सकाळी 11 वाजता बंजारा समाजातील गोरसिकवाडी सामाजिक महिला कर्मचारीच्या वतीने गोर बंजारा संस्कृती वारसा जपण्यासाठी आणि महिला जणजागृती व महिला सक्षमीकरण बंजारा समाजातील तांड्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक आर्थिक, राजकीय, महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम झाल्या पाहिजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे,या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
करिता तांड्यातील याडी भेणे,कर्मचारी सुशिक्षित कर्मचारी अधिकारी या नायकाण यांनी या मेळाव्यात उपस्थिती राहावे आहे. असे आवाहन लता बाई राठोड,समाज सेविका, प्रियंका जाधव,संजना चव्हाण,प्रा सुरेखा चव्हाण डॉ सुनीती राठोड, डॉ सुनीता आडे,डॉ ललिता चव्हाण, डॉ सुजाता चव्हाण, या आणि गोर बंजारा महिला अधिकारी कर्मचारी महिलांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.