Google Doodle : आज व्हॅलेंटाईन डे आहे. या खास प्रसंगी गुगलने एक अप्रतिम डूडल तयार केले असून एक गेमही सादर केला आहे. गुगल दरवर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्त गुगल डूडल गेम सादर करते. व्हॅलेंटाईन डे 2024 च्या निमित्ताने, रसायनशास्त्राच्या अणु बंधांवर आधारित एक खेळ देखील सादर करण्यात आला आहे.
हा एक खेळ आहे तसेच एक क्विझ (quiz) आहे. सध्या, गुगल डूडलच्या होम पेजवर, कॉपर पॅलेडियम म्हणजे ‘Cu Pd’ दोन अणु बंध (एटॉमिक बॉन्ड) दिसत आहेत. यासोबतच या अणूंचे (एटॉम) अणुक्रमांकही (एटॉमिक नंबर) दिले आहेत.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही प्रश्नमंजुषामध्ये भाग घेऊन हे अणुबंध बदलू शकता. गुगलने 2012 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पहिल्यांदा क्विझ सुरू केली होती. Google च्या मते, व्हॅलेंटाईन डे डूडल गेम एक मजेदार आणि परस्परसंवादी (इंटरैक्टिव) प्रेमकथा आहे.
गुगलने या प्रश्नमंजुषामध्ये विरुद्ध आकर्षणे असलेल्या दोन अणूंचा समावेश केला आहे. या प्रश्नमंजुषामध्ये व्यक्तिमत्त्वाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. तुम्ही हा खेळ कोणत्याही एका अणूने (एटॉम) सुरू करू शकता.