न्युज डेस्क – बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 60 व्या जयंतीनिमित्त आज गुगलच्या होम पेजवर आणि खास डूडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यात श्रीदेवीच्या बॉलीवूडमधील तिच्या आयकॉनिक चित्रपटांसह प्रवेशाची झलक देखील दर्शविली आहे. श्रीदेवी यांचाची मूळ नाव श्री अम्मा यंगर अय्यपन (Shree Amma Yanger Ayyappan) आहे. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनमपट्टी येथे झाला. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी सिनेक्षेत्रात पाऊल ठेवले.
श्रीदेवीने सर्वप्रथम ‘कंधन करुणाई’ (Kandhan Karunai) या तमिळ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. वयाच्या 9 व्या वर्षी तिने राणी मेना हे नाव सिनेमापासून बॉलिवूडमध्ये घेतले. हळुहळू तिने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने लोकांवर भुरळ पाडली.
बालकलाकार झाल्यानंतर तिने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी अमोल पालेकर यांच्यासोबत सोलवा सावन आणि जितेंद्र यांच्यासोबत ‘हिम्मतवाला’ चित्रपटात काम केले. हिम्मतवाला हा सिनेमा सुपर डुपर हीट झाला. त्यानंतर त्यांनी जितेंद्रसोबत 16 चित्रपट केले. मिस्टर इंडिया, चांदनी, इंग्लिश विंग्लिश असे अनेक दर्जेदार सिनेमे त्यांनी दिले.
बॉलीवूडमधली अभिनेत्रीचा अंत ही केवळ खेदाची गोष्ट होती. श्रीदेवी 24 फेब्रुवारी 2018 रोजी जुमेराह एमिरेट्स टॉवर (Jumeirah Emirates Tower) मध्ये बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. “अपघाती बुडून” (accidental drowning) गूढ मृत्यू झाल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या.