शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
शहापूर – मुंबईला पाणीपुरवठा करणारा धरणांचा तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख.. मुंबई ला पाणीपुरवठा करणारे तानसा, वैतरणा (मोडक सागर ), भातसा आदी मोठाली धरणे या शहापूर तालुक्यातील आहेत.. गेल्या 8-10 दिवसापासून च्या सतत पडणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रातील पाणी साठा मात्र चांगलाच वाढला आहे.. अशातच आज तानसा धरण संध्याकाळी 4:15 च्या सुमारास भरून वाहू लागले आहे.
तानसा धरण भरून वाहू लागल्या मुळे प्रशासनाकडून नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदी काठावरील गावांना देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 18 गावे व पालघर जिल्ह्यातील 15 गांवांना सावधानतेचा इशारा आहे. शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिंबा, खैरे ही गावे, तर भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे, गणेशपुरी आदी गावे तानसा नदी काठावर आहेत.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोराडे ही गावे. वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरली, अदने, पारोळा, अंबोडे, बँकांचे, साईवान, काशीत-कोरगांव, कोपरगांव, हेडावडे आणि चिमणे आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण भरण्याच्या बातमी मुळे मुंबई करांची पाण्याची चिंता मात्र मिटली आहे असंच म्हणावं लागेल.