Thursday, November 14, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!...५० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर...'या' दिवशी रक्कम जमा होणार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!…५० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर…’या’ दिवशी रक्कम जमा होणार

अमोल साबळे

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधील एक महत्वाची योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना. या योजनेअंतर्गत कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मोठी रक्कम दिली जाते.

जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्ष आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

शेतकऱ्यांना या रक्कमेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 50 हजार रुपयांचे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर (Financial) लवकरच जमा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम 15 ऑक्टोबरपासून जमा होणार होती. मात्र रक्कम जमा नाही झाली याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेली चुकीची माहिती. अशा अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कधी जमा होणार यासंदर्भात थेट शासन निर्णय जारी केला आहे.

शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र; शेतकऱ्यांना होणार फायदा

शासन निर्णय
महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या निर्माण होणारा रोष आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत 12 ऑक्टोबर 2022 रोजी या याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले.

या याद्या आज प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया (KYC process) सुरू करण्यात यावी. तसेच ही केवायसी प्रक्रिया 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याच सूचनांच्या अधीन राहून आज एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळेयेत्या 5 दिवसात याद्या जाहीर होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

शेतकऱ्यांनो रब्बी पिकांसाठी ‘या’ तीन सेंद्रिय खतांचा वापर करा; मिळणार भरघोस उत्पन्न

या दिवशी होणार 50 हजार रुपये जमा
शेतकऱ्यांनो 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही इ-केवायसी (KYC process) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या अनुदानासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही केवायसी बँकांना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिलासादायक बातमी म्हणजे ही इ-केवायसीची प्रक्रिया 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही 50 हजारांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम दिवाळीपूर्वी किंवा ऐन दिवाळीत देखील जमा होऊ शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: