आपल्या देशातील अनेक शहरात कार आणि बाईक इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून एका चार्जमध्ये 300 किमी धावणारी वाहने सध्या बाजारात उपलब्ध असून त्यांच्यासाठी लागणारी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्यासाठी जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मात्र आता भारतातील अनेक राज्यात चार्जिंग सुविधा मिळणार असल्याने इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या स्टॅटिक या कंपनीला १२ राज्यांमध्ये ५०० EV चार्जर बसवणार आहे. (HPCL) या कंपनीला कंत्राट मिळाले आहे. स्टॅटिकने एका निवेदनात म्हटले आहे की, HPCL कडील या करारानुसार, ते सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर स्थापित करेल.
यामध्ये दुचाकी ईव्हीचाही समावेश असेल. हे EV चार्जर 12 राज्यांमध्ये पसरलेल्या HPCL च्या 500 हून अधिक आउटलेटवर (पेट्रोल पंप) स्थापित केले जातील.
आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील HPCL आऊटलेट्सचा करारांतर्गत समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी देखील, स्टॅटिकने लखनौ, गोरखपूर, वाराणसी, पाटणा आणि डेहराडूनसह अनेक शहरांमध्ये HPCL पेट्रोल पंपांवर सुमारे 200 EV चार्जर स्थापित केले होते.