Sunday, November 17, 2024
Homeराज्यगोंदिया | कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका…

गोंदिया | कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका…

गोंदिया – महेंद्र कनोजे

गोंदिया, दी. २०जुन : मे महिन्यात २० रुपये प्रतिकिलो मिळणारा कांदा आता ठोक व्यापारी 35 ते चाळीस रुपयांच्या दरात विकत आहे, आठवडाभारतच कांदा ३५ ते ४० रुपये पार गेला आहे, खुल्या बाजारात चांगला कांदा 50 रुपये किलो पर्यंत विकला जात आहे. तर लाल कांदा ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिळत आहे. पावसाची सुरुवात झाल्यास कांदा १०० रुपये प्रतिकिलो पर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. एका महिन्यात कांद्याचा दर दुप्पट झाला आहे.

चिल्लर व्यापाऱ्यांना कांदा महाग दरात खरेदी केल्यामुळे महाग विकणे भाग आहे तर ग्राहकांनी कमी दरात कांद्याची मागणी केली आहे. कांदे महागल्यामुळे ग्राहक सुद्धा कांदे कमी घेत असल्याचे चिल्लर व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व साधारणपणे कांद्याचे भाव जुलै महिन्यात वाढतात. मात्र यावर्षी जून महिन्यातच भाव वाढले आहेत. कांद्याची आवक मंदावताच नागपुरी कांद्याच्या दराने तेजी घेतली आहे. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे सुद्धा कांदे खराब झाल्यामुळे कांद्याचे दर वाढल्याचे व्यापारी सांगतात.

मे महिन्याच्या सुरुवातीला २० रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांदे बाजारात होते. तर ४० किलोचे पोते ६०० ते ७०० रुपयांना मिळत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील आठवडी बाजारात ४० किलोंचे कांद्याचे पोते १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपये दराने विकले गेले. चिल्लर बाजारात तर कांद्याने डोळ्यांत पाणीच आणले आहे. २०१६-१७ मध्येदेखील कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली होती.

तेव्हा तर सर्वसामान्यांनी कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने घेतला होता. आवक कमी झाली की तीच परिस्थिती यावर्षी देखील बघायला मिळू शकते. नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याचे भाव वधारले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: