Goldie Brar : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रारची हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर अमेरिकेत गोळीबार झाला आहे. डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदरजीत सिंग आहे. पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात 1994 मध्ये जन्म. गोल्डी ब्रारचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त उपनिरीक्षक आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत आहे. मात्र, याआधीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.
पंजाब युनिव्हर्सिटी (PU) चे विद्यार्थी नेते गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्र फेज-1 येथे असलेल्या क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
गोल्डी ब्रार यांचे चुलत भाऊ गुरलाल ब्रार हे लॉरेन्स बिश्नोई यांच्या जवळचे होते. गुरलाल ब्रार यांच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, आता नवे युद्ध सुरू झाले आहे, रस्त्यावर रक्त आटणार नाही.
दरम्यान, गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता. मात्र गुरलालच्या हत्येनंतर तो क्राईमच्या दुनियेत डुबला. कॅनडातूनच गोल्डीने खुनाचा कट रचायला सुरुवात केली आणि त्याच्या गुंडांनी अनेक घटना घडवून आणल्या. यातील एक घटना म्हणजे गुरलाल सिंग यांची हत्या.
18 फेब्रुवारी 2021 रोजी पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोल्डी ब्रारने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी युवक काँग्रेस नेत्याची हत्या केली होती.
गैंगस्टर गोल्डी बराड़ की अमेरिका में हत्या
— Khabri_Prasang (@Prasang_) May 1, 2024
सिद्धू मूसेवाला मर्डर केस का मास्टर माइंड था #GoldyBrar pic.twitter.com/gZXBnYsJOL
29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार यांनी घेतली होती. गोल्डीने हत्येचे कारणही सांगितले. गोल्डीच्या म्हणण्यानुसार, मोहालीतील मिड्डूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता.
नंतर मूसवालाने त्याच्या व्यवस्थापकाला मदत केली. या शत्रुत्वामुळे लॉरेन्स टोळीने मूसवाला यांची हत्या केली. पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फ राणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी ब्रारचा हात होता. खुनापासून सुरू झालेली गुन्ह्यांची ही मालिका अजूनही सुरूच आहे.