अमरावती : समाजातील उपेक्षित व वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. त्याकरिता अमरावती येथील पूर्णा बहुउद्देशीय संस्थेमार्फत अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाकरिता अनुसूचित जातीच्या आणि मांग, गारुडी, वाल्मिकी, ढोर, मादिगा इत्यादी जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
इयत्ता बारावी तथा पदवीधर अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या प्रशिक्षणाकरता पात्र आहेत. IBPS (बँक), रेल्वे स्टाफ (सर्व लिपिक वर्गीय) परीक्षांकरिता पूर्णा बहुउद्देशीय संस्था मोफत प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रुपये ६ हजार विद्यावेतनही दिले जाणार आहे. ही रक्कम प्रशिक्षणार्थ्यांचे खात्यात जमा केली जाणार आहे. हा उपक्रम प्राध्यापक संतोष कुटे राबवित आहेत.
या दरमहा रुपये ६ हजार विद्यावेतनासह मोफत प्रशिक्षणाकरिता पूर्णा बहुउद्देशीय संस्था, गजानन टाऊनशिप, पोटे इंजिनियर कॉलेज जवळ, पेट्रोल पंप समोर, कटोरा रोड अमरावती येथे प्रवेश घेता येईल. अधिक माहितीकरिता 9527948087, 9284416601 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मार्गदर्शक प्राध्यापक संतोष कुटे सर यांनी केले आहे.