सांगली – ज्योती मोरे
सांगली येथील सुवर्ण महोत्सव पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण केलेल्या हिराबाग कॉर्नर गणेशोत्सव मंडळाच्या चांद्रयान-३ या देखाव्यात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अजित गायकवाड, निरीक्षक अभिजीत देशमुख आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी भेट देऊन कौतुक केले.
यावेळी डॉ. तेली यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. मंडळाच्या सदस्यांच्या संकल्पनेनुसारच सदस्य आणि ईगल डिजिटल लॅबचे चालक रावसाहेब मोरे यांनी चंद्रयान देखावा निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी सर्व निर्मिती प्रक्रिया सांगितली. अध्यक्ष रवींद्र बेंडखळे खजिनदार मन्सूर कवठेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी राजू बोरगांवे, बाळासाहेब कातवरे, मंदार थरवल , श्रेयस माळी, ओमकार मनवे , रोहित माळी, कैवल्य गवळी, अभिजित माळी, शिवराज माळी, अनिरुध्द गवळी, अजित बोरगांवे, बापूसाहेब कुडचीकर, विलास मनवे, बापूसाहेब माळी, अशोक माळी, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
या देखाव्यात तांत्रिक कार्य केलेले ॠषिकेश कारंजकर व उमेश पाटोळे, ऑपरेटिंग टिम – यश माळी, प्रथमेश मनवे, वैभव माळी , हर्षवर्धन पाटील शिवदत्त पाटील ,स्वप्नील माळी, मितीलेश मनवे, यासीर कुडचीकर यांचे डॉ. बसवराज तेली, उपअघीक्षक गायकवाड, निरीक्षक देशमुख, आणि आर्कि. प्रमोद चौगुले यांनी कौतुक केले.