Monday, December 23, 2024
Homeराज्यजीवन विकास प्राथमिक शाळा देवग्राम च्या वसुधाला गोल्ड मेडल...

जीवन विकास प्राथमिक शाळा देवग्राम च्या वसुधाला गोल्ड मेडल…

नरखेड – जागतिक महिला दिनानिमित्त वूमेन्स कराटे चॅम्पिअनशीप वास्का कराटे असोसिएशन व सिको काई कराटे असोसिएशेन व लाठी असोसिएशेन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 मार्च 2023 ला सुगत बुद्ध विहार बाभुलबन नागपूर येथेआयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विदर्भातील कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होतो.जीवन विकास प्राथमिक शाळा देवग्राम च्या स्पर्धकांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेमध्ये वसुधा विजय वासाडे हिने काता या इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल , रक्षणदा धनंजय तांबोळी हिने काता इव्हेंट मध्ये सिल्वर मेडल, गायत्री दत्तराज नागपुरे हिने काता इव्हेंट मध्ये ब्राँझ मेडल तर शुभरा अनिल चौधरी हिने कुमिते या इव्हेंट मध्ये ब्राँझ मेडल प्राप्त केले.विजयी स्पर्धकांचे अंत्योदय मिशन देवग्राम चे संस्थापक डॉ.भाऊसाहेब भोगे, अध्यक्ष डॉ. भास्कर विघे, जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, संचालक डॉ. योगेश सरोदे,

जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.रविकांत बाविस्कर, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रामभाऊ बोन्द्रे , प्राथमिक शाळेचे शिक्षक राहुल कोरडे , चेतन पाल , राणी लोहे, व प्रशिक्षक नरेंद्र बिहार , तसेच अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष श्री. मंगेश निंबुरकर यांनी अभिनंदन व कौतुक केले .विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: