Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीगोकुळ शिरगाव । दगड टाकून गटर तुंबवल्याचा जाब विचारल्याने मारहाण...

गोकुळ शिरगाव । दगड टाकून गटर तुंबवल्याचा जाब विचारल्याने मारहाण…

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील जैन मंदिरा मागे राहणाऱ्या अनिकेत आनंदा खोत (वय २२) यास गटारीत दगड टाकून पाणी का अडवले, असा जाब विचारल्याने अक्षय विष्णू साळुंखे व अमित विष्णू साळुंखे (दोघे जैन गल्ली मागे, गोकुळ शिरगाव) दोघा बंधूंनी लाथा बुक्क्यांनी व फरशीच्या तुकड्याने मारहाण करीत जखमी केले.

सदर घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, साळुंखे बंधूंनी गटारीत दगड टाकल्यामुळे काल (ता. ११) रोजीच्या मुसळधार पावसामुळे खोत यांच्या घरात पाणी शिरले.

सदर पाणी त्यांच्या चार खोल्यांमध्ये साचल्यामुळे याबाबतचा जाब विचारण्यासाठी अनिकेत होत साळुंखे यांच्याकडे गेले असता शिवीगाळ करीत व लाथाबुक्याने मारहाण केली याचवेळी गटारीवरील फरशीचा तुकडा कपाळावर मारल्याने अनिकेत गंभीर जखमी झाले. याबाबतची फिर्याद जखमी अनिकेत यांनी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक इदे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: