Sunday, December 22, 2024
Homeराजकीयगुवाहाटीमध्ये जाऊन करोडाचा व्यवहार करता इथे एक किलो साखर वाटून दाखवा...रवी राणांचे...

गुवाहाटीमध्ये जाऊन करोडाचा व्यवहार करता इथे एक किलो साखर वाटून दाखवा…रवी राणांचे बच्चू कडूंना आव्हान…

अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेरा आमदार रवी राणा यांच्यात आता चांगलीच जुंपली असून आमदार रवी राणा यांनी किराणा वाटपावरून प्रतिउत्तर देतांना थेट गुवाहाटी ला जाऊन करोडोंचा व्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर केला आहे. काय म्हणाले आमदार रवी राणा पाहूया…

शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू व भाजप समर्थित आमदार रवी राणा यांच्यामध्ये चांगलच शीत युद्ध पेटल आहे, काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा व नवनीत राणा या दाम्पत्यावर किराना वाटपा वरून टीका केली होती, याला आज आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना जोरदार अस प्रत्युत्तर दिलं.

बच्चू कडू यांच्यावर बोलतांना त्यांची अनेक आरोप केलेत, बच्चू कडू हे फर्स्ट्रेशन मध्ये गेले आहे, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला, गुवाहाटी मध्ये जाऊन त्यांनी करोडोचा व्यवहार केला असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला, तर तुम्ही सुद्धा एक किलो साखर वाटून गरिबांची दिवाळी साजरी करा तर बच्चू कडू ही नौटंकी छाप आहे,मी गरिबी भोगली आहे,गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो अस प्रत्युत्तर त्यांनी बच्चू कडू यांना दिल.

महाविकास सरकार पाडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांपैकी बच्चू कडू होते, तेव्हा काही आमदारांकडून 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र आता तर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी गुवाहाटी मध्ये करोडो रुपयांचा व्यवहार केला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यामुळे जनतेला यावर विस्वास होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: