Monday, December 23, 2024
HomeAutoमुंबईमध्ये दिसणार नवीन 'Audi Q3' ची झलक...

मुंबईमध्ये दिसणार नवीन ‘Audi Q3’ ची झलक…

मुंबई – Audi ही जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी त्यांच्या भारतभरातील रोडशोचा भाग म्हणून मुंबईमध्ये नवीन ऑडी क्यू३ दाखवणार आहे. जर्मन-फीचर्ड शो कार ३ व ४ सप्टेंबर रोजी ऑबेरॉय मॉल, मुंबई येथे आणि ६ व ७ सप्टेंबर रोजी ऑडी शोरूम, मुंबई साऊथ येथे दाखवण्यात येईल. या रोडशो दरम्यान ग्राहकांना डिलिव्हरींपूर्वी नवीन ऑडी क्यू३ची झलक पाहता येईल.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आम्ही भारतात नवीन ऑडी क्यू३ सादर करण्यासाठी अत्यंत उत्सुक व सज्ज आहोत. डिलिव्हरीपूर्वी आमची गाहकांना नवीन ऑडी क्यू३ ला जवळून पाहण्याची संधी देण्याची इच्छा आहे. मला खात्री आहे की, आम्ही नवीन ऑडी क्यू३ दाखवण्यास उत्सुक असल्याप्रमाणे संभाव्य ग्राहक, ब्रॅण्ड उत्साही आणि ऑडी क्यू३ प्रेमी देखील ही कार पाहण्यासाठी उत्सुक असतील.”

ऑडी क्यू३ भारतातील विभाग-अग्रणी कार राहिली आहे आणि लवकरच नवीन अवतारामध्ये पुनरागमन करणार आहे. मूळ ऑडी क्यू३ तिच्या काळातील गेमचेंजर होती आणि तिचे स्वत:चे चाहते आहेत. नवीन ऑडी क्यू३ अत्याधुनिक डिझाइन, आकर्षक इंटीरिअर, कार्यक्षम इंजिन आणि ग्राहकांच्या इच्छेनुसार आरामदायी व सोईस्कर सुविधांसह वारसाला पुढे घेऊन जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: