मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर येथील मूर्तिजापूर कारंजा राज्य महामार्गावर तुरखेड फाट्यानजिक झालेल्या अपघातातील मृतकांच्या नातेवाकांनी दोषी कार चालकास कठोर शिक्षा व्हावी या हट्टा पोटी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथील शौविच्छेदन गृहाजवळ नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला.
भरधाव वेगाने मुर्तीजापुर वरून कारंजाच्या दिशेने सुझुकी एस प्रेसो कार क्रमांक MH -37-V-5210 ने भडशिवणी येथून लग्न समारंभ आटपून ॲपे (ॲटो) MH-37-G-572 यास कार चालक ग्रामसेवक रामदास रघुनाथ मुळे (४५) राहणार कारंजा याने मद्यधुंद अवस्थेत ॲपे (ॲटो) ला विरुद्ध दिशेने वाहन चालवून धडक दिल्याने ॲटोचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला यामध्ये उज्वला विश्राम जाधव रा. जितापुर नाकट (५५) तर दिया अजय पवार रा.पारधी वाडा कानडी या ७ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर ॲटोमधील इतर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
यावरून मद्यधुंद अवस्थेत निष्काळजी पणाने वाहन चालवित रस्त्यावरील वाहनांना उडविणाऱ्या आरोपी ग्रामसेवक रामदास रघुनाथ मुळे (४५) यांच्यावर पोलिसांनी ३०४ A,२७९,३३७,३३८,१८४,१८५ अन्वय मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला परंतु नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सदर कारचालकावर खुनाचा खटला दाखल करून कलम ३०२ अंतर्गत कारवाई करण्याची अट्टाहास धरला असून मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे सांगितल्या जात आहे.