रामटेक – राजू कापसे
रामटेक येथिल उपविभाग मधील रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्यांतर्गत येणाऱ्या परिसरातील शेतकर्यांना भात रोवणीसाठी पेंच धरणाचे पाणी द्यावे, अशी मागणी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली आहे.
नागपूर जिल्हा रामटेक उपविभाग हा भात उत्पादनाचा पट्टा मानला जातो. रामटेक,पारशिवनी तालुक्यासह मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धानाचे पीक घेत असतात.
या भागात कमी पाऊस पडल्यामूळे सध्या या तालुक्यांतील काही शेतकर्यांना भात लावायला पाणी मिळत नाही आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड झाले आहे.धान लागवडीबाबत शेतकरी चिंतेत आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्यास धान पिकाचे नियोजन कोलमडून जाईल. पेंच, तोतलाडोह आणि खिंडसी ही प्रमुख पाण्याचे जलाशय याच भागात आहेत.
या जलाशयांचे पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात यावे व पेंच कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी केली.किरात भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केली.
यावेळी जेष्ठ भाजप नेते विजय हटवार,उमेश पटले,नंदकिशोर कोहळे,अलोक मानकर,करिम मालाधारी आणि शेतकरी प्रामुख्याने उपस्थीत होते.