Sunday, November 17, 2024
Homeराज्यलासुरा गावाला बस द्या, अन्यथा आंदोलन विद्यार्थ्यांसाठी विहिंप बजरंग दल आक्रमक...

लासुरा गावाला बस द्या, अन्यथा आंदोलन विद्यार्थ्यांसाठी विहिंप बजरंग दल आक्रमक…

खामगाव – हेमंत जाधव

लासुरा गावातून दररोज १५० पेक्षा जास्त विद्यार्थी खामगाव शहरात शिकण्यासाठी येतात; परंतु बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. करिता शहरबस सुरु करण्यात यावी, अशी मागणी विहिंप बजरंग दल खामगाव व विद्यार्थ्यांच्या वतीने वाहतूक नियंत्रक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेगाव तालुक्यातील लासुरा या गावातून दररोज जवळपास १५० विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षणासाठी खामगाव शहरात जातात. या गावाची लोकसंख्या पाच हजार आहे
लासुरा खु.,लासुरा बु ही गावे आहेत, तर हल्ली गावात बसेसच येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

करीता खामगाव ते लासुरा गावापर्यंत शहर बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे. या निवेदनावर बजरंग दल जिल्हा सह संयोजक पवनजी माळवंदे,शहराध्यक्ष आशिष लांडगे,लासुरा गावातील प्रतिष्ठित नागरिक विहिंप चे सुनीलजी जवंजाळ बजरंग दल विद्यार्थी प्रमुख शुभम मुधोळकर,अभिषेक थोरात,सह संयोजक मुकुल गवळी सोबत हे निवेदन लासुरा येथील विद्यार्थी विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून दिले.

विदर्भाची पंढरी शेगाव येथे तसेच खामगाव येथे भाविक,गावकरी कामानिमित्त शहरात ये जा करतात. या रस्त्यावरील गावातील विद्यार्थ्यांना शिक्षनासाठी शहरात जावे लागते. सर्वच विद्यार्थी काही गाडी विकत घेऊ शकत नाही.शिक्षणास शहरात येणारी शेतकऱ्यांची मुले आहेत. प्रशासनाने त्यांचा मागणीची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल. – आशिष लांडगे लांडगे शहराध्यक्ष बजरंग दल

लासुरा येथून शहरात शिक्षणास येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थीनी आहेत शिक्षण बंद झाल्यास मुलींचे लग्न लावले जाते. गावातील सर्व मुलींना शिक्षणाची आवड आहे, परंतु प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. मागणी पूर्ण करावी अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय नाही – ऋतुजा दाणे (विद्यार्थीनी)

अनेक वेळेस आम्हा विद्यार्थ्यांना बस नसल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आधीही बस सुरळीत सुरू करावी, अशी मागणी केली होती. मात्र मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. काही दिवसांत शहर बस सुरू झाली नाही तर आम्ही विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. – प्रशांत जवंजाळ ( विद्यार्थी )

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: