गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांचे नेतृत्वात शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे संदर्भात विभागीय आयुक्त नागपूर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
हजारो किलोमीटर अंतरावर कुटुंबापासून दूर राहून सेवा करणाऱ्या शिक्षकांसाठी 03ऑक्टोबर 2003 रोजी शासनाद्वारे शासन निर्णय करून अशा शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदेने एक आगाऊ वेतनवाढ देणे संदर्भात आदेशित केले आहे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता नव्याने गृहीत धरल्याने ते बदलून आलेल्या जिल्हा परिषदेत सेवा कनिष्ठ ठरतात त्या बदल्यात शासनाने त्यांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचे ठरविले आहे.
या शासन निर्णयानुसार जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बदलून गोंदिया जिल्हा परिषदेत आलेले आहेत, त्यांना अद्यापपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली नाही, यामुळे हजारो अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकावर अन्याय होत असल्याची बाब यावेळी किशोर बावनकर सर यांनी विभागीय आयुक्त यांचेसमोर मांडली. याबाबत लवकरच जिल्हा परिषद गोंदियाला आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त यांनी ठोस आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, राज्य उपाध्यक्ष आयुब खान,तालुकाध्यक्ष तथा संचालक कैलास हांडगे,प्रशांत चव्हाण, सुरेश आमले ,हूमेंद्र चांदेवार,महेश भिवगडे,नामदेव पटणे,किशोर लंजे,लोकेश मेश्राम हे उपस्थित होते.