पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील चतारी येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे जगदविख्यात बुद्धमुर्ती शिल्पकार सुरेश खंडेराव यांच्या संकल्पनेतून २८ डिसेंबर १६ रोजी २८ तासात तयार केलेल्या विशालकाय २८ फुट लांब महापरिनिर्वाण अवस्थेत असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीला सहा वर्ष पुर्ण होत असुन २८ डिसेंबर रोजी या विशालकाय भगवान गौतम बुद्धाच्या मुर्तीचा स्थापना वर्धापनदिन व चिवरदान समारोह आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमादरम्यान सकाळी७वाजता धम्मध्वजारेहण, वदंना व परिञाणपाठ, ११ वाजता चिवरप्रदान सोहळा,
न१२ते१ भिक्षू संघ धम्मदेसना दुपारी १ते२ सामाजिक प्रबोधन दुपारी २ भोजनदान सायंकाळी ६ वाजता बुद्ध भिम गिताचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला भदंन्त गुणरत्न महाथेरो , भदंन्त विनयपाल थेरो, भदंन्त प्रज्ञादिप थेरो हे धम्मदेसना देतील या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. विशाल नंदागवळी तर प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जि प अध्यक्षा संगिता अढाऊ, जि प उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे,
सामाजिक न्याय मानवाधिकार संरक्षण संघाचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे, पातुर तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ,वंचित बहुजन आघाडी पातुर तालुका संघटक चंद्रकांत तायडे, पातुर पं स सभापती सुनिता अर्जुन टप्पे, उपसभापती इम्रान खान मुमताज खान हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत तरी परिसरातील अनुयायांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन भीमशक्ती क्रीडा मंडळ, महामाया उपासिका संघ, व समस्त गावकरी मंडळी चतारी यांनी केले आहे