Sunday, December 22, 2024
Homeराज्यव्हॉईस ऑफ मीडिया राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अवॉर्ड २०२३ मध्ये घोरमारे यांच्या राज्यस्तरीय...

व्हॉईस ऑफ मीडिया राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अवॉर्ड २०२३ मध्ये घोरमारे यांच्या राज्यस्तरीय सत्कार…

रामटेक – राजु कापसे

नुकत्यांच मुंबई येथे दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी होऊ घातलेल्या “व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिज्म अवॉर्ड्स २०२३” च्या “व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण २०२३” पुरस्काराकरिता सावनेर तालुक्यातील दिलीप घोरमारे यांची निवड करण्यात आली.

देशातील क्रमांक एक नंबरची पत्रकार संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांना सकारात्मक बातम्यांच्या पुरस्कारा सोबतच संघटनात्मक दृष्टीने चांगले काम करणाऱ्या तालुका, जिल्हा, महानगर विभागीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आले.

महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या पुरस्काराची घोषणा संघटनेचे कार्याध्यक्ष मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केली असून सावनेर तालुक्यातील उत्कृष्ठ पत्रकार जर्नलिज्म अवॉर्ड्स विदर्भ विभाग तालुकाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. राजकीय, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या हस्ते सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी , मंत्रालयाच्या समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, कर्जतचे आमदार रोहितदादा पवार, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, परभणीचे आ. राहुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, आरोग्यदूत ओमप्रकाश शेटे,

संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, मंत्रालयातील सचिव डॉ. नामदेव भोसले, संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले,शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष लढ्ढा, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: