Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनगझलमंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र, तथा मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने...

गझलमंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र, तथा मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड, परभणी येथे संपन्न होणार…

पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

मुंबई – गणेश तळेकर

मराठी गझल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी गझल मंथन साहित्य संस्था आणि गंगाखेड येथील मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी गझलेचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून तसेच मराठी साहित्याने, साहित्य जाणिवेने, महाराष्ट्रातील साहित्यचळवळ समृद्ध व्हावी ह्या हेतूने दि. १३ व १४ मे २०२३ रोजी गंगाखेड शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

गझल मंथन साहित्य संस्था ही साहित्य चळवळीत कार्यरत असलेली संस्था असून संस्थेने आतापर्यंत, शहादा, लातूर, धुळे, रत्नागिरी, पुणे, पनवेल, ठाणे, जळगांव, मुंबई अशा विविध ठिकाणी, मराठी गझल मुशायरे, कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, पुस्तक प्रकाशने आयोजित केलेली आहेत. याचसोबत गझलेचे ऑनलाईन मार्गदर्शन, गझलेला वाहिलेले फेसबुक पेज, युट्युब चॅनेल याद्वारे गझल गायकांद्वारे गझलेला स्वरसाज देवून गझलप्रसाराचे काम जोमाने पर पाडले जात आहे.

यावेळी पहिल्यांदाच गझल मंथन संस्था ही मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान ह्या नावाजलेल्या संस्थेसोबात संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय गझल संमेलन आयोजित करत आहे जिथे महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि गझल क्षेत्रातील दिग्गज साहित्यिकांचे विचार, गझल आणि मैफिल ऐकण्याची दुर्मिळ संधी रसिकांना उपलब्ध होत आहे.

ह्या दोन दिवसीय संमेलनांत मराठी गझल संग्रह आणि काव्यसंग्रहांचे प्रकाशन, गझलेतील प्रतिष्ठेचा ‘ जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा, निमंत्रितांचा गझल मुशायरा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकाराची प्रकट मुलाखत, गझलेतील विविध ज्वलंत विषयांना अनुसरून आयोजित केलेला दिग्गज साहित्यिकांचा परिसंवाद, सुप्रसिद्ध गायक श्री. संकेत नागपुरकर यांच्या सुश्राव्य गझल गायनाची मैफिल महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकारांचे अनेक मुशायरे आदि कार्यक्रमांची गच्च मेजवानी रसिकांसाठी ज्ञानेंद्रिये तृप्त करणारी ठरणार आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे ह्या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटक तथा स्वागताध्यक्ष आहेत, संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार नितिन देशमुख(अमरावती) ह्यांची उपस्थिती राहणार आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध कवी व गझलकार श्री. प्रमोद खराडे हे ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ गझलकार श्री. म. भा. चव्हाण ( पुणे), डॉ. ज्ञानेश पाटील ( जळगांव) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. संमेलनात महाराष्ट्रातील काही नामवंत निमंत्रित गझलकारांचा मुशायरा असणार आहे यात प्रशांत वैद्य (ठाणे), अमोल शिरसाट(आकोला),दर्शन शहा (हैद्राबाद),प्रा. सिद्धार्थ भगत (यवतमाळ) यांचा सहभाग राहणार आहे.

संमेलनाला अनिल कांबळे – अध्यक्ष गझलमंथन साहित्य संस्था, वसुदेव गुमटकर – उपाध्यक्ष, जयवंत वानखडे-सचिव, उमा पाटील सहसचिव,भरत माळी प्रसिद्धि प्रमुख यांसोबतच, हनुमंत मुंढे – अध्यक्ष मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान, ॲड. मिलिंद क्षीरसागर- सचिव, हनुमंत लटपटे, राजेभाउ बापू सातपुते – सदस्य या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. संमेलन यशस्वी होण्यासाठे विविध समित्या गठित केलेल्या असून, श्री. यशवंत मस्के हे संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत.

त्यांचेसोबत कवी विठ्ठल सातपुते, आत्माराम जाधव, डॉ. अविनाश कासाडे, प्रा. दीनानाथ फुलवाडकर, रत्नाकर जोशी, आत्तम गेंदे, एम.एम. नागरगोजे,संजय तिडके, गणेश नरवटे , दिवाकर जोशी, महेश होनमाने, सिद्धेश्वर इंगोले, शिवशंकर डोईजड हे सम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

संमेलनात महाराष्ट्रभरातील गझलकार, रसिक तथा साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत असून ह्या दोन दिवसीय संमेलनाला गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. कैलास गायकवाड,डॉ. शिवाजी काळे,निलेश कवडे स्नेहल कुलकर्णी,

डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. राज रणधीर,शांताराम(शाम) खामकर समीर बापट, उर्मिला बांदिवडेकर यांनी उपस्थिती सुद्धा राहणार आहे. गंगापूरकरांना प्रसिद्ध गायक संकेत नागपुरकर यांची गझल मैफिल अनुभवायला मिळणार आहे. साहित्यानुकूल सजलेले व्यासपीठ, सुसज्ज सभागृह दोन दिवस गच्च आयोजिलेले कार्यक्रम आणि गझलमय ४८ तासांनी गंगाखेड नगरीची साहित्य चळवळ सम्रुद्ध करणारा हा उपक्रम कुणीच चुकवू नये असा आहे.

गझलमंथन साहित्य संस्था : मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: