मुंबई – गणेश तळेकर
गझल मंथन साहित्य संस्था,कोरपना रजि. नं. एफ – १५१६३ (चंद्रपूर) व्दारा सर्वोत्कृष्ट मराठी गझल संग्रहाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये १११११ चा धनादेश, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असणार आहे.
पुरस्कारासाठी दिनांक १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले गझलसंग्रह पाठवता येतील. गझलकाराने संग्रह पाठवताना पुढील नियम व अटींची पूर्तता करावी. १) प्रकाशित गझलसंग्रह हा दिनांक १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील मराठी भाषेतील गझलसंग्रह असावा.
२) प्रकाशित गझलसंग्रहात केवळ मराठी गझल असाव्यात त्यात काही कविता व काही गझल असे स्वरूप नसावेत. ३) गझल संग्रहाच्या तीन प्रती व गझलकार परिचय तसेच गझलसंग्रह स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबतचे पत्र दिलेल्या मुदतीत संस्थेस प्राप्त होणे आवश्यक राहील, ४) गझलसंग्रहास आयएसबीएन नंबर असणे आवश्यक राहील.
५) गझलसंग्रहाचे परीक्षण महाराष्ट्रातील दोन मान्यवर जेष्ठ गझलकारांकडून तसेच द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय कोरपनाच्या भाषा समिती सदस्यांकडून करण्यात येईल परीक्षण करणाऱ्या मान्यवर जेष्ठ गझलकारांचे नाव संस्थेकडून गुप्त ठेवण्यात आले आहे.
६) गझल मंथन साहित्य संस्था,कोरपना जिल्हा चंद्रपूर या संस्थेच्या राज्य कार्यकारिणी सभासदांना व सन्मानित मार्गदर्शक समिती सदस्यांना गझलसंग्रह पुरस्कार स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०२४ आहे.
भारतातील सर्व मराठी गझलकारांना विनंती करण्यात येते की, सदर कालावधीत प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहाच्या तीन प्रती श्री.जयवंत वानखडे,(माजी प्राचार्य ) सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, मु.बुरान ले आऊट,वार्ड नंबर १, टीचर कॉलनी,कोरपना तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर पिनकोड ४४२९१६ भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५ या पत्त्यावर पाठवाव्यात.