महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे दुर्लक्ष…प्रवाश्यांची गैरसोय.
नरखेड – अतुल दंढारे
जलालखेडा बस स्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ्तागृह फक्त सांगायला असून. नवीन बांधण्यात आलेले स्वच्छता गृह शोभेची वस्तू बनले असून अजून पर्यंत ते सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या स्वच्छ्ता गृहात सर्वत्र डबके साचके असून पाण्याची व्यवस्था नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.
त्यामुळे आजूबाजूच्या दुकान दाराना याचा मोठा त्रास होत आहे. जलालखेडा हे गाव राज्य मार्गावर असून जवळपास 40 ते 50 गावे याला जोडलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी येथे कामा निमत्य येत असतात. तसेच जलालखेडा येथे प्राचीन किल्ला असून पर्यटक येथे येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. परंतु बस स्थानकावर मूलभूत सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी कोंढी होते. मुत्री घरात सर्वत्र डबके साचले असून सर्वत्र घान पसरलेली आहे.
स्वच्छ्ता गृहात पाण्याची सोय नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंध सुटलेले आहे. त्यांचं प्रमाणे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छ्ता गृहाला गेल्या 2 वर्षा पासून लॉक लावून ठेवन्यात आले असून अजून पर्यंत ते प्रवाशा करिता सुरू करण्यात आलेले नाही. पिण्याच्या पाण्याची सुध्दा व्यवस्था नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.
विशेष महिला प्रवाशी व शाळेच्या मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तातडीने याकडे लक्ष देऊन बस स्थानकावर मूलभूत सुविधा पुरवाव्यात तसेच स्वच्छ्ता गृहाची साफ सफाई व पाण्याची व्यवस्था करावी अशी प्रवाशांची करत आहे.
युवकांनाच वाटली काळजी.
जलाल खेडा येथील युवकांनी पैसा गोळा करून जलाल खेडा येथील बस स्थानकावर स्वच्छ्ता गृह बांधून तिथे सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना साठी बस स्थानकावर स्वच्छ ता गृहाची व्यवस्था नसल्यामुळे महिला वर्गाना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे युवक वर्ग समोर येऊन आर्थिक मदत करून तिथे स्वच्छ्ता गृह बनवून देण्यास तयार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख पिंटू मानकर यांनी सांगितले. या साठी ते परीवह विभागाला निवेदन देऊन बस स्थानक परिसरात स्वच्छ्ता गृहाचे बांधकाम करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलालखेडा येथील बस स्थानकावर स्वच्छ्ता गृहात पाण्याची व्यवस्था नसून. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच बस स्थानकावर प्रवाशांनसाठी मूलभूत सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे.
पिंटू मानकर शिवसेना शहर प्रमुख.
मी दररोज बस नी जलालखेडा येथे येत असतो. इथल्या बस स्थानकावर स्वच्छ्ता गृहाची सोय नसून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. कित्येकदा बस ची वाट पाहत बस स्थानकावर उभे राहावे लागते परंतु सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्यामुळे आम्हाला व विद्यार्थ्यांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रियाज पठाण प्रवाशी