सांगली – ज्योती मोरे
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीमधून शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील दोन रस्त्यांच्या कामांसाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खिलारे मंगल कार्यलय मुख्य रस्ता ते प्रथमेश कांबळे यांचे घर व आकाशवाणी पाठीमागील मुख्य रस्ता ते नारायण यनकलेव यांचे घर या दोन रस्त्यांच्या यामध्ये समावेश आहे. आमदार गाडगीळ यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान शामरावनगरसह विस्तारित भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिली. ते म्हणाले, राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विकास कामामध्ये गतिमान आहे. विकासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीग्रस्त व महापुरग्रस्त भागातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी होकार देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे…
यावेळी शहाजी भोसले, शैलेश पवार, रोहीत जगदाळे, रोहीत बाबर, उमेश नरगूंदे, अमर पडळकर, प्रशांत पाटील सर, रविंद्र करंजे, दिनेश डबडे ,सचिन गवळी, सचिन दौडमणी, शोयब नदाफ, बापू कांबळे, अनिल जाधव, ओंकार जाधव, संजय जाधव, ज्ञानेश्वर डबडे, गजनान कांबळे, अभिजीत खांडेकर, गणपती साळुंखे, ठेकेदार डी एम पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुण पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.