Monday, December 23, 2024
Homeराज्यस्पर्धा परीक्षा केंद्रात 'केंद्रीय अर्थसंकल्पावर' महाचर्चा...

स्पर्धा परीक्षा केंद्रात ‘केंद्रीय अर्थसंकल्पावर’ महाचर्चा…

जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम…

केंद्रीय अर्थसंकल्पावर महाचर्चा…

विद्यार्थ्यांनी सांगितले अर्थसंकल्पातील गुण-दोष…

नरखेड – अतुल दंढारे

देशाचा अर्थसंकल्प नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला.नेहमीच सत्ताधारी पक्ष अर्थसंकल्प उत्तम तर विरोधी पक्ष अर्थसंकल्प वाईट अशी प्रतिक्रिया देतात.मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ मध्ये काय चांगले दिसले व अजून काय हवे होते ?

हे जाणून घेण्याकरिता महाचर्चा ‘जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र,काटोल’ येथे आयोजित केली होती. अर्थसंकल्पात तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे.३३%खर्च हा रोजगार निर्मितीसाठी होणार आहे.त्यामुळे बेरोजगारी कमी होईल असे मत गौरव गाढवे यांनी मांडले.भरडधान्याच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष देण्यात येणार यामुळे अन्नधान्याची निर्यात होईल व देशाला परकीय चलन प्राप्त होईल असे मत भुपेश बेंडे यांनी व्यक्त केले.

डिजीटल लायब्ररी निर्मीती व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यामुळे कौशल्य विकास होईल.विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित झाल्यामुळे विविध क्षेत्रात रोजगार मिळेल असे मत भूषण आगरकर यांनी मांडले.पंतप्रधान आवास योजनेच्या रकमेत 66% वाढ करण्यात आलेली आहे.मोफत धान्य योजनेचा कार्यकाळ वर्षाअखेरपर्यंत वाढविला त्यामुळे गोरगरीब जनता आशेचे किरण या अर्थसंकल्पात दिसल्याची भावना स्वर्णा कोटजावळे यांनी व्यक्त केली.

तर इंग्रजीत अर्थसंकल्प मांडण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्प कळतच नाही.मनरेगा सारख्या योजनेचा निधी 32% पर्यत कमी केल्यामुळे ग्रामीण रोजगार कमी होईल असे अक्षय कावटे यांनी मत व्यक्त केले.28% पर्यत गॅस व पेट्रोल वरील सबसिडी कमी केल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियांचे आर्थिक बजेट कोलमडेल.असे मत समिक्षा कोल्हे यांनी व्यक्त केले.

शिक्षण क्षेत्रातील बजेट 2.64% वरून 2.51% कमी केल्यामुळे शिक्षणविषयक योजनेला कात्री बसेल.तसेच आरोग्य क्षेत्रातील बजेट 2.20 वरून 1.98% कमी केल्यामुळे वैद्यकीय योजनेवर वाईट परिणाम होतील.महिला व बालविकास विभागाच्या खर्चाला सुद्धा कात्री दिलेली असल्याची प्रतिक्रिया अक्षय कावटे यांनी दिली.केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भविष्यात पाच राज्याच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गरीब व श्रीमंत यांना खुश करणाऱ्या योजना आणल्या आहे.तर मध्यमवर्गीय कुटूंबियावर अन्याय केलेला आहे असे मत कपिल आंबूडारे यांनी व्यक्त केले.

यावेळी अभ्यासकेंद्राचे समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे, संगणक ऑपरेटर सतिश बागडे यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते तसेच प्रतिक मानेराव,वेदप्रकाश खवसे,शुभम शेंडे,यशस्वी गजभिये, जास्मिन अंसारी,नवीन बासेवार यांनी आपले मत मांडले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: