Monday, December 23, 2024
Homeराज्यनांदेड मध्ये एका तरुणाकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुस व मॅग्झीन जप्त :...

नांदेड मध्ये एका तरुणाकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुस व मॅग्झीन जप्त : आरोपीस २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी व फरार आरोपीचा शोध घेत असताना एक तरुण कंबरेला पिस्टल घेऊन थांबल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्या तरुणांस पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक उप विभाग नांदेड इतवारा यांच्या आदेशाने 23 मार्च रोजी उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकं यांना अगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने रेकॉर्ड वरील आरोपी, फरारी आरोपी, वॉरंट मधिल आरोपी यांच्या शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकचे अंमलदार पेट्रोलिंग करीत ढवळे कॉर्नर येथे पोहचेले असता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक 20 ते 22 वर्षाचा इसम त्याच्या कमरेला गावठी पिस्टल घेऊन अन्सारी हॉस्पिटल समोर सय्यद टी स्टॉल जवळ वसरणी नांदेड येथे थांबलेला आहे.

सदर माहीतीच्या अनुषंगाने सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड, यांनी नमुद इसमास छापा मारुन ताब्यात घेण्याचा सुचाना दिल्या त्याप्रमाणे उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी अन्सारी हॉस्पिटल समोर सय्यद टी स्टॉल जवळ वसरणी नांदेड या ठिकाणी सापळा रचुन संशयित व्यक्तीच्या हलचाली वर लक्ष दिले असता एक 20 ते 22 वर्षाचा इसम सदर ठिकाणी संशयित रित्या मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.

सदर इसमास त्यांचे नांव गांव विचारणा केली असता त्यांनी आपले नांव गंगाप्रसाद दयानंद महाजन वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मु.पो. तामसा ता. हदगाव जि. नांदेड ह.मु.शंकर नगर वसरणी नांदेड असे सांगितले. पंचासमक्ष सदर इसमास त्याचे अंगझडतीचा उदेश कळवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुस असे मिळुन आले.

त्यास शस्त्र बाळगण्याच्या परवण्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे कळवुन सदर पिस्टल गावठी असल्याचे व ती विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीस कॉस्टेबल संतोष बेल्लुरोड यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे नांदेड ग्रामिण येथे. गु.र.न.227/2024 कलम 3/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार कांबळे करीत आहेत.

सदर आरोपीस मा. न्यायलयात हजर केले असता आरोपीची मा. न्यायलयाने दि.26मार्च पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी कडे गावठी पिस्टल राऊंड अनुषंगाने तसेच विविध मुदयावर तपास चालु आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, सुशिलकुमार नायक उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांचे मार्गदर्शना खाली व सुचना प्रमाणे उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकाचे अंलमदार पोलीस नाईक अर्जुन मुंडे, पोलीस कॉस्टेबल चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर विभागाचे पोलीस हवलदार राजु सिटीकर यांनी केली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: