बाळापूर – सुधीर कुमार कांबेकर
बाळापूर महामार्गावरील रिधोऱ्या जवळ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एलपीजी गँसने भरलेल्या टँकरला अपघात झाल्याने राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघाताचीपुनरावृत्ती टळल्याने मोठा अनर्थ टळला वेळीच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत टॅकरसह आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात अणली महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूकठप्प झाली होती.
अपघातात जखमी झालेला टैँकरचालक आलोक बिलेंद्रसिंग यांस सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी अपघाताबबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गँसने भरलेला टँकर क्रमांक एम. एच.०४, जेके १८७८ हा खामगावरून अकोल्याकड़े येत असतांना महामार्गावरील रिधोरा गावाजवळील कलकत्ता ढाब्याजवळ टॅकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे झालेल्या अपघातात टॅकर चालक आलोक सिंग हा जखमी झाला असून त्याला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांसह महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले, या अपघातामुळे ठप्प झालेलीवाहतूक सुरळीत करण्यात आली.
याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. गँस टँकरच्या अपघाताने पाहून तेथून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. गँस टँकरचा अपघात बघता जयपूर येथील घटनेची आठवण प्रत्येकाला झाल्याने मनातभीतीचे वातावरण होते.