अकोला – विलास सावळे
अकोला अकोट फेल विजय नगर येथील बजरंग चौक भागात झालेल्या गॅस विस्फोट घरांना लागली आग दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास विजय नगर इथे गॅसचा स्फोट झाल्याने चार ते पाच घरे जळून खाक झाली. तसेच अग्निशामक विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जीवन आवश्यक वस्तू या आगीत जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळतच भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर व विजय अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले, गॅस विस्फोटामुळे ज्या लोकांची घरे जळाली व त्यांना आर्थिक नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत प्रदान केली याप्रसंगी पवन महल्ले, कमल खरारे, उज्वल बामनेट, उमेश लखन, प्रकाश घोगलिया, आकाश सावते, सुनिल मेश्राम रोशन जगताप,गणेश माने आदी उपस्थित होते.