Spanish Woman : देशाला कलंकित करणारी घटना झारखंडमधील दुमका येथे घडली. दोन दिवसांआधी भारतात भटकंतीसाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आता गँगरेप पीडितेने कथन केलेल्या घटनेची भयावह कहाणी ऐकून अंगावरील काटा उभा राहील.
स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की घटनेदरम्यान सात आरोपी तिला सतत लाथा मारत होते. एवढेच नाही तर पीडित विदेशी महिलेने सांगितले की, ‘बलात्काराचा आरोपी तिच्या पतीचे हात बांधून मारहाण करत होता.’
ती महिला म्हणाली, ‘मला वाटले की आरोपी मला त्या रात्री मारतील पण देवाच्या कृपेने मी अजून जिवंत आहे.’ दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.
झारखंड: पति के साथ भारत घूमने आई विदेशी पर्यटक के साथ सामूहिक बलात्कार #Jharkhand #Dumka #SpanishWoman #CrimeAgainstWomen #झारखंड #दुमका #स्पेनिशमहिला #महिलाओंकेखिलाफअपराधhttps://t.co/CYKCdGNATp
— द वायर हिंदी (@thewirehindi) March 3, 2024