सांगली – ज्योती मोरे.
कमी दराने सोने विक्रीचे आमिष दाखवून हे बनावट सोनं खरेदीसाठी आलेल्या मयूर सुभाष जैन.राहणार- शिवाजीनगर, पुणे.याच्यासह त्याच्या तीन मित्रांना पोलीस असल्याचे सांगून दमदाटी करत त्यांच्याकडून रोख 25 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा.सांगली आणि भुईंज पोलीस ठाणे सातारा यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत आनेवाडी टोल नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतले.
दरम्यान, कमी दराने सोने खरेदीसाठी सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केट,कोल्हापूर रोड इथं फिर्यादी मयूर सुभाष जैन. वय वर्ष- 39. राहणार- 309 सुमंगल अपार्टमेंट,6 मोतीबाग बी एस के हरियाली जवळ शिवाजीनगर ,पुणे. यांच्यासह त्याचे मित्र सचिन काळभोर,सुनील चव्हाण, आणि हर्षद बेदमुथा आरोपी अशोक रेड्डी यांच्याकडे आले असता रेड्डीआणि इतर पाच जणांसह संगणमत करून दोन साथीदार हे पोलीस असल्याचे सांगून फिर्यादींकडून 25 लाख रुपये रोख घेऊन सोने न देता तिथून पलायन केले.
त्यानंतर फिर्यादी जैन यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.सदर आरोपींना शोधण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक तयार करून सूचना दिल्या.
तपास सुरू असतानाच सदरचे आरोपी हे MH 12 PZ 7992 या वाहनातून पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन भुईज पोलीस ठाण्याच्या मार्फत आनेवाडी टोल नाक्यावर नाकाबंदी लावण्यासाठी कळवले त्याप्रमाणे नाकाबंदीत सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील साडेबारा लाख रुपये रोख आणि पंधरा लाख रुपये किमतीची कंपास जीप असा एकूण 27 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून प्रशांत भुजंगराव निंबाळकर.वय वर्ष- 48 राहणार- नांदूर, तालुका- नांदूर,जिल्हा- बुलढाणा. प्रवीण महादेव खिराडे. वय वर्षे -37, राहणार- तायडे कॉलनी, खामगाव,जिल्हा- बुलढाणा. मानसी सुरेश शिंदे,
राहणार -सारोळा,तालुका- मुळशी, जिल्हा- पुणे. सध्या राहणार- शिवसाई नगर, वाघजाई मंदिराजवळ,सुतारदरा कोथरूड, पुणे.आणि नम्रता शरद शिंदे.वय वर्ष- 28,राहणार- सारोळा ,तालुका- मुळशी,जिल्हा पुणे.सध्या राहणार-शिवसाई नगर,वाघजाई मंदिराजवळ, सुतारदरा,कोथरूड, पुणे.आदींचा समावेश आहे.गुन्ह्यातील आरोपी आणि मुद्देमाल सांगली शहर पोलीस ठाण्याकडे पुढील तपासकामी वर्ग करण्यात आला आहे.सदर आरोपींना न्यायालयात पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.उर्वरित आरोपींचा आणि पैशांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे ऍडमिशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे आणि त्यांचा स्टाफ भुइंज पोलीस ठाणे सातारा तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गायकवाड,कुबेर खोत,सचिन धोत्रे, सुनिता शेजाळे, संदीप नलवडे, संदीप गुरव, पोलीस नाईक अनिल कोळेकर,पोलीस कॉन्स्टेबल बाळू सुतार, आदींनी केली आहे.