खामगाव – हेमंत जाधव
खामगाव येथे या वर्षी पहिल्यांदा पत्रकारांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. खामगाव शहरातील पत्रकार बांधवांनी या वर्षीपासून गणेशोत्सव प्रारंभ केला आहे.
या मध्ये त्यांनी स्थानिक खामगाव पत्रकार गणेश मंडळाच्या वतीने पत्रकार भवन येथे विधिवत गणेशमूर्ती स्थापन करून उत्सवास प्रारंभ केला आहे या ठिकाणी पत्रकारांकडून रोज सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात पत्रकार मुबारक खान यांनी गणरायावर गीत सुद्धा सादर केले.
श्री गणेशाची मूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहे ही मूर्ती पत्रकार स्वरूपात आहे, मूर्ती चा पेहराव कुर्ता पैजामा आहे, मूर्तीच्या एका हातात बुम तर दुसऱ्या हातात कॅमेरा आहे जे की इलेक्ट्रॉनिक मीडिया चे मुख्य साहित्य आहे आणि बाकी दुसऱ्या दोन्ही हातांमध्ये न्यूज पॅड व पेन आहे जे की प्रिंट मीडिया चे साहित्य आहे. या मूर्ती ची सर्वत्र चर्चा होत असून सर्व पत्रकार बांधवांचे कौतुक होत आहे