Monday, December 23, 2024
Homeराज्यगणेशोत्‍सव देखावा सजावट स्‍पर्धा 2022...माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

गणेशोत्‍सव देखावा सजावट स्‍पर्धा 2022…माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

महेंद्र गायकवाड
नांदेड

मतदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी व मतदारांनी आपल्या मतदानाच्या कर्तव्याचे चोख पालन करावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ ही गणेशात्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या विषयासंबंधी असून गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा सजावट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे दिले जाणार आहेत.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटी सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही या स्‍पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सजावटीचे छायाचित्रे जास्‍तीत जास्‍त 5 एमबी साईजचे व जेपीजी फॉरमॅटमध्‍येच पाठवावेत. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) साईज जास्‍तीत जास्‍त 100 एमबी असावी. तसेच ध्वनिचित्रफीत एमपी 4 फॉममॅटमध्‍ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी हे साहीत्य पाठवायचे आहे.

मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरीकांने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवुन मंडळाना देखाव्यांच्या माध्यमातुन तर घरगुती पातळीवर गणेश – मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ, निरपेक्ष राहुन आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयावर आपल्या देखाव्याच्या सजावटीतून जागृती करता येवु शकते. या स्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयाचे https://ceo.maharastra.gov.in/ या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमावर देण्यात आलेली आहे.

स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळानी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्‍ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहीती भरुन आपल्या देखावा सजावटीचे चांगल्‍या प्रतीचे फोटो पाठवायचे आहेत. या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्‍याकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम क्रमांक 51 हजार, व्दितीय क्रमांक 21 हजार, तृतीय क्रमांक 11 हजार व उत्‍तेजनार्थ 5 हजार रूपयाचे एकुण 10 बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी प्रथम क्रमांक 11 हजार, व्दितीय क्रमांक 7 हजार, तृतीय क्रमांक 5 हजार व उत्‍तेजनार्थ 1 हजार रूपयाचे एकुण 10 बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. याप्रमाणे बक्षिसांचे स्‍वरूप आहे. या स्‍पर्धेत सहभागी सर्व स्‍पर्धकांना मुख्‍य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्‍यात येणार आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्‍ती, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागु झालेल्या चार अर्हता तारखा (1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्‍टोबर ) यांसाठी प्रसार-प्रचार केला जावा. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: