Saturday, September 21, 2024
Homeमनोरंजनगणेश तळेकर यांचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे मुंबई केंद्रप्रमुख म्हणून सन्मानचिन्ह देऊन...

गणेश तळेकर यांचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे मुंबई केंद्रप्रमुख म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार…

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या १००वे वर्ष निमित्ताने “नाट्यजागर स्पर्धा” भरविण्यात आली , त्यात “नाट्यसंगीत पद” स्पर्धा घेण्यात आली, दिनांक : ६ मे २०२४ रोजी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त श्री. शशी प्रभू, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डाफळे, प्रसिद्ध सिने- नाटय विजय गोखले व सविता मालपेकर , परिक्षक – शारदा दादरकर, ज्ञानेश पेंढारकर, मधुवंती दांडेकर
यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद तर्फे ” नाट्यजागर स्पर्धा – २०२४ ” मध्ये मुंबई यशवंतराव नाटय संकुल , माटुंगा येथे माझा ” मुंबई केंद्रप्रमुख म्ह्णून सन्मानचिन्ह ” देऊन मान्यवर परिक्षक प्रसिद्ध मधुवंती दांडेकर , शारदा दादरकर ,ज्ञानेश पेंढारकर व प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री सविता मालपेकर, विजय गोखले यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.मला दिलेल्या या सन्मानाबद्दल मी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पदाधिकारी , कर्मचारी , व सभासद व शिवाजी शिंदे यांचा खूप खूप आभारी आहे. – गणेश तळेकर

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: