३ जानेवारीला रामटेक च्या दिशेने प्रस्थान…
गडमंदिरावर होणार विविध धार्मिक कार्यक्रम…
रामटेक – राजू कापसे
नागपूरच्या टीमकी वरून ३ जानेवारीला श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी यात्रा निघणार असुन ती ५ जानेवारी ला प्रख्यात रामनगरीत दाखल होणार आहे. दरम्यान रामटेकवासीयांसह नागपुर ते रामटेक अंतरावरील ठिकठिकानच्या गावातील भावीक, नागरीक पालखी यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज राहाणार आहे.
शुभ्र वस्त्र व डोक्यात शुभ्र टोपी घातलेले शेकडो भक्तजन महाराजांच्या दीव्य पादुकांना घेऊन रामटेकला ५ जानेवारीला पोहचेल. दरम्यान सुरुवतीला शितलवाडी येथे मौदा मार्गावरील शनी मंदिर येथे शनी मंदीर देवस्थान कमेटी शितलवाडी तर्फे पालखीचे भव्य स्वागत करण्यात येईल.
यानंतर पालखी शितलवाडी येथील श्री संत गजानन महाराज मंदीर येथे जाईल. येथे महाप्रसाद झाल्यानंतर पालखीचे रामनगरी ( रामटेक) कडे प्रस्थान होईल. रामनगरीत श्री परमानंद स्वामी मठ येथे येईल व येथुन मग प्रख्यात श्रीराम गडमंदिराकडे पालखीचे प्रस्थान होईल.
यादिवशी रामनगरीत महिला वर्ग रस्त्या रस्त्यावर, घरापुढे, अंगणात रांगोळी काढुन पालखीप्रती आपली आस्था दर्शवितात. या रस्त्यांवरून पालखीयात्रा गडमंदिर ला पोहोचेल. येथे रात्री महाराजांच्या पालखीचे वास्तव्य राहून दुसऱ्या दिवशी महाप्रसादानंतर यात्रेचा समारोप होईल.यात्रेत सहभागी भक्तांसाठी रामटेक येथे सेवाभावी संस्था तथा नागरीकांकडून जागोजागी पाणी,चहा आणि अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात येत असते.