Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayगडचिरोली | किती ही असंवेदना…लाज कशी वाटत नाही?...मंगलाची कूस उजाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित...

गडचिरोली | किती ही असंवेदना…लाज कशी वाटत नाही?…मंगलाची कूस उजाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा…

जनसंघर्ष समितीची शासनाकडे मागणी

मिलिंद खोंड

गडचिरोली 28फेब्रुवारी: गर्भात वाढलेले बाळ जन्मताच ते दगावण्याचा प्रसंग शत्रुवरही ओढवला जाऊ नये, इतकी ही घटना संवेदनशील असते. मात्र, संभावित धोका माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे, हे पापच आहे. असेच पाप कमलापूरच्या शासकीय हत्ती कॅम्प बाबत संबंधित अधिकाऱ्यानीं केले आहे.

भामरागड, सिरोंचा क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘जनसंघर्ष समिती, नागपुर’ ने कमलापूर हत्ती कॅम्प साठी विशेष पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याची मागणी वेळोवेळी केली होती. येथे असलेल्या हत्तीच्या मंगला ही गर्भवती असल्याने संबंधित महिला वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्याबाबत आग्रह धरला होता. मात्र, बघू, विचारू अशी उत्तरे मिळाली होती. येथील कळपाच्या आरोग्यासाठी महिन्या दोन महिन्यातून पशू वैद्य चिकित्सक नागपुरातून येतो, तपासणी व जुजबी उपचार करतो आणि परत निघून जातो.

सोमवारी २६ फेब्रुवारी २०२३ ला मंगला प्रसूत झाली. पण, तिचा पिल्लू जास्त काळ जगू शकला नाही. आपलं पिल्लू उठत का नाही, हालचाल का करत नाही? यामूळे कासावीस झालेल्या मंगलाचा आक्रोश साऱ्या कमलापूर वासिंना थरारून सोडणारा होता. मंगलाची प्रसूती जवळ आली असतानाही येथे डॉक्टर नसणे ही दुर्लक्षपणाची गोष्ट आहे. येथे नियमित चिकित्सकाची नियुक्ती असती तर आज मंगलाचा बाळ जगला असता आणि कमलापूर पुन्हा आनंदाने फुलले असते. मात्र, सध्या दुःखाच्या सावटात आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन का होऊ नये ?असा सवाल उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: