गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षल विरोधी अभियान राबवित असताना शुक्रवारी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले अधिक चौकशी अंती नक्षलवादी असल्याचे निष्पन झाल्यावर त्याना धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येते अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे सनीराम उर्फ शंकर कृष्णा शामलाल नरोटे रा. मोरचूल तालुका.धानोरा व ससूराम उर्फ सूर्या नरोटे असे असून दोघा वर दहा लाखांचे बक्षीस होते.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यानी शनिवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिलेल्या माहिती नुसार सनीराम नरोटे हा 15 आक्टोबर 2015 पासून टीपागड दलम मध्ये सामील होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता त्याचा वर खून ,जाळपोळ , चकमक असा अनेक गुन्हा मध्ये त्याचा सहभाग होता.
शासनाकडून त्याचा वर 08 लाखांचे बक्षीस ठेवले होते ससूराम नरोटे हा जनमिलीशिया दलमचा सदस्य होता.
नक्षलवाद्यांचा खून ,जाळपोळ ,चकमकी आदी गुन्हात सहभागी होता शासनाने त्यांचावर 02 लाखांचे बक्षीस ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून वरिष्ट नक्षलवादी कॅडर कडून त्याना उत्तर गडचिरोली मध्ये नक्षल चळवळी बाबत माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आले होते अशी माहिती पोलीस चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांनी दिली आहे.
या दोघांचा अटकेमुळे उत्तर गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा पाय रोवण्याचा इराद्याला आळा बसला असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यानी सांगितले आहे.या पत्रपरिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख , अहेरी चे अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उपस्थिती होती