गडचिरोली – उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाया पोमकें गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात मिळालेल्या गोपणिय बातमीच्या आधारावरअपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख. यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 3.30 वा. दरम्यान सदर जंगल परिसरात 20 ते 25 अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला.
विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीदरम्यान सदर जंगल परिसरात, काही नक्षल पिठ्ठु व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले.
सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, शोध मोहीम सुरु आहे.