Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीगडचिरोली | पोलिस-नक्षल चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा...गडचिरोली पोलिस दलाचे मोठे यश...

गडचिरोली | पोलिस-नक्षल चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा…गडचिरोली पोलिस दलाचे मोठे यश…

गडचिरोली:1एप्रिल

पोलिस व नक्षल्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणार्‍या मुसपर्शी जंगल परिसरात आज, 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सी-60 पोलिस जवान नक्षलविरोधी शोध मोहीम राबवित असताना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला.

या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले. सोबतच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्या ठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत असून, अजूनही चकमक सुरू असून सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: