Saturday, December 21, 2024
Homeराज्यछत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्प गडचिरोली पोलिसांनी केला उध्वस्त….नक्षल साहित्य केले जप्त...

छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्प गडचिरोली पोलिसांनी केला उध्वस्त….नक्षल साहित्य केले जप्त…

गडचिरोली – मिलिंद खोंड

दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून आहेत.

यावरून अपर पोलीस अधीक्षक (अभियान )यतीश देशमुख नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक काल सकाळी 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी माओवादी हे नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते.

सदर डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी सापडली ती अभियान पथका द्वारे नष्ट करण्यात आली.सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात माओवादी सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: