Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यगडचिरोली पोलीसांनी केली २३ नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी...

गडचिरोली पोलीसांनी केली २३ नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कटटरजनमिलिशियास अटक…

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस

गडचिरोली – मिलिंद खोंड

09/12/2023 रोजी टिटोळा ता.एटापल्ल्ी जि.गडचिरोली येथील पोलीस पाटील नामे लालसु वेळदा यांचे हत्येमधील आरोपी जहाल जनमिलिशिया नामे अर्जुन सम्मा हिचामी, वय 19 वर्षे, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली हा पोस्टे पोस्टे गटटा (जां.) हददीत गटटा नाल्याजवळ पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान आणि पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली.

अधिक तपासात असे दिसून आले की, 23 नोव्हेंबर 2023 रोजी टिटोळा गावातील युवकांच्या रोजगारासाठी झटणा-या पोलीस पाटलाच्या पोलीसांचा खबरी असल्याच्या कारणावरुन माओवादयांकडुन करण्यात आलेल्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे.सदर घटनेच्या काही दिवसापुर्वी त्याने माहीती आणि ठावठिकाणा हा माओवादयांना सांगितला होता.

तसेच पोस्टे गटटा (जां.),हेडरी,आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर तो बारिक लक्ष ठेवुन होता.तसेच या वर्षाच्या फेब्रूवारीच्या उत्तरार्धात व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथ्ील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रीय सहभाग होता.

त्यास पोस्टे गटटा (जां.) ता,एटापली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302,36ड 4,143,147,148,149,120-ब भादवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहेत. तसेच टिटोळा ता.एटापल्ली जि.गडचिरोली येथ्ील पोलीस पाटलाच्या हत्येमघ्ये अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.

अटक जहाल जनमिलिशिया बाबत माहिती

नामे अर्जुन सम्मा हिचामी
दलममधील कार्यकाळ

श्व् 2021 पासुन तो झारेवाडा आणि आजुबाजुच्या भागात कार्यरत जनमिलीशिया म्हणुन सक्रीय होता.
श्व् येत्या काही दिवसात पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सामील होण्याची त्याची योजना होती.

कार्यकाळात केलेले गुन्हे, जाळपोळ – 02, माहे फेब्राुवारी 2022 मध्ये विसामुंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा सहभाग होता, माहे मार्च 2023 मध्ये झालेल्या अलेंगा-पुरसाळगोंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा सहभाग होता.

श्व् खुन – 01

माहे नोव्हेंबर 2023 रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील लालसु टिंगरा वेळदा या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग. शासनाने जाहिर केलेले बक्षीस. महाराष्ट्र शासनाने अर्जुन सम्मा हिचामी याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: