Monday, December 23, 2024
Homeराज्यगडचिरोली | अहेरी तालुक्यात 'मेरी माटी मेरा देश' अभियानाला थाटात सुरुवात...

गडचिरोली | अहेरी तालुक्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला थाटात सुरुवात…

राजे अम्ब्रिशराव महाराज अमृत कलश यात्रेत झाले सहभागी.

जनतेचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद

गडचिरोली – स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या समारोपीय टप्प्यात आयोजीत करण्यात आलेल्या विविध ऊपक्रमांना सर्वत्र सुरुवात झालेली दिसते.अहेरी तालुक्यात सुध्दा शहीद विर बाबुराव शेडमाके यांचे जन्मस्थळ किष्टापुर (दोडगेर) येथील निवास स्थल असलेल्या भुमीचे विधीवत पुजन करण्यात आले व तेथील माती तसेच सभामंडपाच्या ठिकाणची माती अमृत कलशात गोळा करण्यात आली.

वाजागाज्यासह तेथुन अमृत कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली.आबालवृध्द अमृतकलश यात्रेत मोठ्या ऊत्साहाने सहभागी झाले.गावात ऊत्सवासारखे वातावरण निर्माण झाले.विर बाबुराव शेडमाकेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत यात्रा पुढे निघाली.

जिम्मलगट्टा,गुंडेरा,रेपणपल्ली,कमलापुर,छल्लेवाडा,राजाराम,खांदला,रायगट्टा,तिमरम,गुड्डीगुडम, आलापल्ली, नागेपल्ली इत्यादी सर्व गावात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.ठिकठिकाणी शाळकरी मुलांनी रॅलीद्वारे यात्रेत सहभाग घेतला.

दरम्यान मार्गावरील सर्वच गावातील अमृत कलश संकलीत करण्यात आले.दिल्ली येथील कर्तव्यपथावर निर्माण होत असलेल्या अमृतवाटीकासाठी सर्व अमृत कलश पाठविण्यात येतील. या कार्यक्रमाचे आयोजन रवि नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी यांनी केले!

यावेळी रवि नेलकुद्री,संतोष मद्दीवार,अमोल गुडेल्लीवार, गुड्डू ठाकरे,विनोद जिल्लेवार,विकास तोडसाम,विकास उईके,मुकेश नामेवार,प्रशांत कुत्तरमारे,प्रशांत नामनवार,अक्षय संतोष,सारंग रामगिरी,प्राजक्ताताई पेदापल्लीवार,हर्षाताई ठाकरे, शालिनीताई पोहणेकर,विजयाताई विठ्ठलानी, सिद्धीकी ताई, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: