Monday, December 23, 2024
Homeराज्यगडचिरोली | एसटी महामंडळाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे यंत्र अभियंता निलंबित...

गडचिरोली | एसटी महामंडळाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे यंत्र अभियंता निलंबित…

काल सोशल मिडीयावर एसटी बसचा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर आगीसारखा पसरला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत असताना एसटी महामंडळाने यंत्र अभियंत्याला अखेर निलंबित केले असल्याचे आपल्या Twitter च्या माध्यमातून एक खुलाश्याचे पत्र पोस्ट करीत लिहले…प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही..!

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच ४० वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले. यासंदर्भात सदर बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता श्री. शी. रा. बिराजदार ( विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव श्री. बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

यापुढे वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: