गडचिरोली – मिलिंद खोंड
गडचिरोली जिल्हयामध्ये शासकीय नौकर भरती आणि पोलीस भरती मध्ये 02 वर्ष वाढवून देण्यासंदर्भात रोजी बेरोजगार युवकांनी अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतिश देशमुख याना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित व अतिशय मागासलेला जिल्हा असून या भागातील युवक / युवती यांची पोलीस भरती मध्ये वर्णी लागावी या उद्देशाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे मात्र या पोलीस प्रशिक्षण मध्ये वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष करण्यात आल्याने सर्व युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शासन परिपत्रकानुसार पोलीस भरती वयोमर्यादा 02 वर्ष वाढवलेली आहे परंतु पोलीस विभागांकडून प्रशिक्षणाची वयोमर्यादा 18 ते 33 असे आहे तरी ही वयोमर्यादा वाढवून 33 ऐवजी 35 वर्ष करण्यात यावी या करिता .
अतिरिक्त पोलीस अधीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे, यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पुढे बोलले की आपला निवेदन स्वीकारून आपल्याला योग्य सहकार्य करण्यात येईल आणि शासन परिपत्रकामध्ये जे उल्लेख आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत ची पोलीस भरती घेण्यात येईल त्या करिता पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना माहिती देण्यात येईल आणि या गडचिरोली जिल्यातील युवक /युवतीना योग्य आम्ही सहकार्य करू असे आश्वासन देण्यात आले. निवेदन देताना नरेश मिसाळ , शिवा पवार , नितेश राजकोडावार , अक्षय निकोडे तालुक्यातील युवक वर्ग यांची उपस्थिती होती.