गडचिरोली पोलिसांनी खामगाव येथून घेतले ताब्यात…
आरोपीस 4 दिवसाची पोलीस कोठडी…
गडचिरोली – महागाव येथील बहुचर्चित पाच जणांच्या हत्येच्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांना पुन्हा एका आरोपीस अटक करण्यात यश आले असून. त्यास गुरुवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीस 30 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक आरोपी संघमित्रा रोशन कुंभारे हिच्या पुर्वाश्रमीचा असलेला मित्र अविनाश ताजणे, रा. खामगांव, जि. बुलढाणा याने विष खरेदी करण्याकरीता संबंधीत कंपनीस पैसे पुरविल्याचे निष्पन्न झाले.
अविनाश ताजणे व संघमित्रा कुंभारे हे त्यांचे शालेय जिवनापासून मित्रमैत्रिण असुन संघमित्रा कुंभारे हिचा रोशन कुंभारे यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही दिवस दुरावा निर्माण झाला. परंतु संघमित्रा कुंभारे ही उपचारार्थ तिचे माहेरी अकोला येथे गेली असतांना ती परत अविनाश ताजणे याचे संपर्कात येवून तिने तिच्या सासरच्या लोकांकडून होणाया त्रासाबाबत त्याला सांगीतले.
नजीकच्या काळात त्यांच्यातील संपर्क वाढल्याने संघमित्रा हिने तिच्या सासरच्या व्यक्तींना मारण्याची योजना अविनाश ताजणे यांस सांगून त्याची मदत मागीतली. तेव्हा अविनाश ताजणे याने संघमित्रा कुंभारे हिच्या सांगण्यावरून दोन वेळा विष खरेदी केले व ते विष खरेदी करण्याकरीता पैसे पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न होताच तात्काळ एक तपास पथक अकोला, खामगांव परिसरात रवाना करून अविनाश ताजणे यांस ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्राची कबुली दिल्याने त्यांस गुरुवारी 26 ऑक्टोबररला गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.
गुन्ह्राचे गांभीर्य बघून पोलीस कोठडीत असलेले आरोपी संघमित्रा रोशन कुंभारे व रोेजा प्रमोद रामटेके यांना 04 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे.
पोलीस अधीक्षक, नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) ,कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व मनोज काळबांडे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलीस निरीक्षक बालाजी सोनवणे व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे.