गडचिरोली – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उद्योगाचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, डावोस येथे झालेल्या करारानुसार लॉयर्ड मेटल व वरद फेरो या कंपन्यासाठी उद्योग उभारणीसाठी 963 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे त्याची अधिसूचना लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे त्यासोबतच लॉयड्स मेटल ही कंपनी 20000 कोटींची जिल्ह्यात गुंतवणूक करणार आहे.
त्यासोबतच जिल्ह्यात उद्योगासाठी दोन्ही कंपन्याना 22000 कोटींच्या जमिनीचे अधिग्रहण केल्याच्या सूचना कंपनी मालकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात 508 हे.जमीन अधिग्रहित करणार आहे. त्यासाठी लवकरच उच्च स्तरीय कमिटी मध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यासोबतच जिल्ह्यात स्टील उद्योगाचा विकासासाठी गडचिरोली एमआयडीसी विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी 500 ते 1000 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे त्यासोबत मुलचेरा तालुक्यात 500 ते 1000हेक्टर जमीन, आरमोरी तालुक्यात 500 हेक्टर जमीन सिरोंचा तालुक्यात 500 हेक्टर जमीन उद्योगासाठी संपादित करणार असल्याचे उद्योग मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.एकूण जिल्ह्यात उद्योगासाठी 5000 हे.जमीन अधिग्रहित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार कार्यालय, विश्वकर्मा योजना इ.सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असण्यासाठी 14 कोटी खर्चून उद्योग भवन उभारणार असल्याची माहिती यावेळी उद्योग मंत्री सामंत यांनी दिली त्याचे भूमिपूजन येत्या काळात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सिमेंट उद्योगाला चालना देणाऱ्यासाठी अंबुजा व जेएसडब्ल्यू ह्या कंपन्या गुंतवणूक करणार असल्याची त्यांनी सांगितले त्यासोबतच आढावा बैठकीत सुरजागड लोहखदान ,वैद्यकीय महाविद्यालय,वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग आदींचा आढावा घेतला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात गडचिरोली येथे स्टील उद्योगाचा विस्तार करण्यासाठी उद्योजकांची परिषद घेण्यात येणार आहे त्यातून गडचिरोली हे उद्योगासाठी कसे भयमुक्त आहे हे उद्योजकांना पटविण्यात येणार आहे त्याचबरोबर येथील उद्योगास स्थानिक लोकांना रोजगार देऊन स्किल सेंटरची उभारणी सुद्धा करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारणी करण्यासाठी त्याच उद्योगांनी पुढाकार घेऊन उभ्या कराव्या अश्या सूचनाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल्या. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक विपिन शर्मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना पोलीस उपमहा निरीक्षक संदीप पाटील व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.